Mon. Oct 3rd, 2022

शिवसेना खा.डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जबरा फॅन. स्वतःच्या रक्ताने बनविली श्रीकांत शिंदे यांच्या नावाची पाटी.

शिवसेना खा.डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जबरा फॅन. स्वतःच्या रक्ताने बनविली श्रीकांत शिंदे यांच्या नावाची पाटी.

ठाणे लाईव्ह :- नाद करा पण शिवसैनिकाचा कुठं असे म्हणतात  ते खरच म्हणावे लागेल. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील शिवसैनिक ओम जाधव याने स्वतःच्या रक्ताने शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत शिंदे या नावाची पाटी भेट म्हणून तयार केली आहे. ही अनोखी भेट हा शिवसैनिक खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाची भेट म्हणून देणार आहे.

४ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने श्रीकांत शिंदे यांच्या या जबऱ्या चाहत्याने ही रक्ताने बनविलेली पाटी तयार करून आता ही नावाची पाटी त्यांना भेट देणार आहे.

47276 Views
Shares 0