Wed. Mar 29th, 2023

लॉकडाऊनमुळे कामं नसलेल्या कामगारांना खा. डॉ. श्रीकांत शिंदेंचा मदतीचा हात.

लॉकडाऊनमुळे कामं नसलेल्या कामगारांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा मदतीचा हात.

खासदार खासदार श्रीकांत शिंदेंचा मदतीचा हात.
जीवनाश्यक वस्तूंची करताहेत वाटप.

हजारो कामगार कुटुंबांसाठी मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खासदार श्रीकांत शिंदेंनी सुरू केले आहे

ठाणे लाईव्ह :- राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रत्येकजण युद्ध पातळीवर कार्यरत आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकार वेळोवेळी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवत आहेत.

या उपाययोजना राबवत असताना सरकारी तिजोरीवर त्याचा खूप मोठा ताण पडत आहे. शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाला खायची भ्रांत पडत आहे. यासाठी हातभार म्हणून खारीचा वाटा उचलत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने हजारो कामगार कुटुंबांसाठी मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. घरोघरी जाऊन त्या साहित्याचे वाटप केले जात आहे. यापूर्वी देखील पोलीस, कामगार, इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, बेघर यांना दोन वेळ जेवणाचे पाकीट ते मतदारसंघात वाटत आहेत.

51788 Views
Shares 0