Mon. May 23rd, 2022

आठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.

आठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.

ठाणे लाईव्ह :- कल्याण-डोंबिवलीसह शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात. तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील. याकरता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी सातत्याने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा पाठपुरावा सुरू होता.

या प्रयत्नांना यश आले असून गौरीपाडा, कल्याण पश्चिम परिसातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये लॅब उभारण्यात येत असून या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा आज डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला.

या लॅबमध्ये दररोज ३ हजार चाचण्या करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज (#NABL) या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांच्या निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे.
या पाहणीदरम्यान महापौर विनिता राणे, माजी महापौर, स्थानिक नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक विश्वनाथ राणे महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

2006 Views
Shares 0