Wed. Mar 29th, 2023

रेल्वे अपघातांवर आळा बसण्यासाठी, भारतीय रेल्वे घेणार “कवच” तंत्रज्ञानाची मदत ! वाचा कसे काम करेल हे “कवच”

देशात होणाऱ्या रेल्वे अपघातांवर आळा बसण्यासाठी 'कवच' प्रणाली मदत करणार...

भारतात होणारे रेल्वे अपघात लक्षात घेत, रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देत, केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वे एकत्र येऊन ‘कवच’ नावाचं एक तंत्रज्ञान आणत आहेत. देशात होणाऱ्या रेल्वे अपघातांवर आळा बसण्यासाठी हे तंत्रज्ञान मदत करणार आहे. शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी ‘कवच’ची चाचणी घेतली. त्यावेळेस रेल्वेचे इतर अधिकारी ही तिथे उपस्थित होते.

‘कवच’ प्रणालीची चाचणी गुल्लागुडा ते चिट्टगिडा या स्टेशन दरम्यान करण्यात आली, त्यावेळी रेल्वेमंत्री स्वतः इंजिनावर उपस्थित होते. या चाचणी दरम्यान दोन वेगाने येणाऱ्या ट्रेन्स एकमेकांवर आदळण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा ‘कवच’ प्रणालीने आपलं काम सुरु करून, स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टीमचा वापर केला आणि इंजिन ३८० मीटर अंतरावर थांबले. गेट सिग्नल जवळ येताच इंजिनची स्वयंचलित शिट्टी जोरात आणि स्पष्ट वाजली, या चाचणी दरम्यान चालकाने आवाज आणि ब्रेकिंग सिस्टिमला हाथ देखील लावला नाही. लूप लाईनवर इंजिन चालवताना ३० किमी प्रतितास वेग मर्यादा तपासण्यात आली. तेव्हा ‘कवच’ने आपोआप ६० किमी प्रतितास इंजिनाचा वेग ३० किमी प्रतितास करून लूप लाईनमध्ये प्रवेश केला.

‘कवच’ ही भरतीय उद्योग आणि रिसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनद्वारे स्वदेशी विकसित केलेली प्रणाली आहे. धोक्याचा सिग्नल देणाऱ्या वाहनांसाठी, भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेच्या टक्करा टाळण्यासाठी ही प्रणाली मदत करणार आहे.

अजून काय करू शकतं ‘कवच’ ?

१ रेड सिग्नल ओलांडण्यापासून रोखू शकतं.

२ जास्तीचा वेग रोखण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टिम कवचमध्ये आहे.

३ ड्रायव्हर मशीन इंटरफेस / लोको पायलट ओप्राशन कम इंडिकेशन पॅनल मध्ये दर्शविलेल्या सिग्नल पोझिशनसह टर्नच्या हालचाली चे सतत अपडेट कवच देऊ शकतं.

४ ‘कवच’मुळे रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ जाताच आपोआप शिट्टी वाजते.

५ कवच आणीबाणीच्या प्रसंगी SOS संदेश पाठवू शकतो.

६ ‘कवच’च्या नेटवर्क मॉनिटर सिस्टिमद्वारे ट्रेनच्या वाहतुकीवर लाईव्ह निरीक्षण ठेवता येते.

 

 
 
194 Views
Shares 0