
महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ गरजू महिलांनी व दिव्यांग बांधवांनी घ्यावा मा.महापौर नरेश म्हस्के यांचे आवाहन
मुंबई ठाण्यासह राज्यातील नऊ महापालिकांची मुदत मार्च मध्ये संपणार असून उल्हासनगर महापालिकेची मुदत एप्रिलमध्ये संपुष्टात येणार आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महापालिककांवर सहा महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने निवडणुका सप्टेंबर पर्यंत पुढे जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
ठाणे महापालिकेची मुदत ५ मार्चला, नागपूर ४ मार्चला, मुंबई, सोलापूर ७ मार्चला, अकोला, अमरावती ८ मार्चला, पिंपरी-चिंचवड १३ मार्चला, पुणे आणि नाशिक १४ मार्चला, तर उल्हासनगर महापालिकेची मुदत चार एप्रिलला संपणार आहे. तो पर्यंत सर्व महापालिकांच्या निवडणुका घेणे अशक्य असल्याने प्रशासकीय राजवट अटळ मानली जात आहे.
More Stories
ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी
कोकणासह ठाणे, मुंबईत ढगाळ वातावरण
आरसीबीची टीम ठाण्यात दाखल; आयपीएल पूर्व तयारीच्या सरावसत्रला सुरवात