Wed. Mar 29th, 2023

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात गेल्या पाच महिन्यांपासून स्थिरता… जाणून घ्या काय आहे यामागचे कारण ?

मार्च महिन्यात घरगुती सिलेंडरचे दर पूर्वी एवढेच असून व्यावसायिक सिलेंडर महागले आहेत.

 

रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू, इंधने, खनिज तेल यांच्या किंमतीत वाढ होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई प्रचंड वाढली, तरीही देशात मात्र या घटनेचा फारसा काही परिणाम झाल्याची चिन्ह दिसून आली नाहीत. याचं एकमेव कारण म्हणजे ‘निवडणूका’ ! सध्या देशभरात निवडणुकीकचे वारे वाहत असल्याने या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत नाही आहेत. कारण निवडणुकांदरम्यान जीवनाश्यक गोष्टी, प्रामुख्याने घरगुती गॅस सिलेंडर यांच्या दरांत वाढ होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.

व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढत असताना, घरगुती सिलेंडरचे दर मात्र गेल्या पाच महिन्यात वाढलेले नाहीत. मार्च महिन्यात घरगुती सिलेंडरचे दर पूर्वी एवढेच असून व्यावसायिक सिलेंडर १०५ रुपयांनी महागले आहेत. जिल्ह्यातील निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरु होताना दिसत आहेत, तर देशातील विविध भागात मतदानही झाले आहे. पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर निवडणूका पारपडे पर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार नाहीत यासाठीची सगळी काळजी सत्ताधारी घेत आहेत.

 

निवडणुका झाल्यावर मात्र या रशिया-युक्रेन वादामुळे जीवनावश्यक वस्तूंसोबत गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात भीषण वाढ होऊन त्याच्या झळा थेट सर्वसामान्यांना बसणार हे अटळ आहे.
314 Views
Shares 0