का नाही उचलू शकत भारत आजच्या चीनच्या आर्थिक अडचणींचा फायदा !!

आज चीन ची अर्थव्यवस्था ही भारता पेक्षा अडचणीत आहे असे म्हटले जाते की भारत त्याचा फायदा उचलेल पण भारत समोर सुद्धा काय आहेत त्या अडचणी ज्यामुळे भारत चीन च्या अडचणींचा फायदा स्वतः चा व्यवसाय वाढवण्यासाठी नाही करू शकत , पुढील गोष्टी त्याला कारणीभूत आहेत
1.आपल्याकडे आज इन्फ्रास्ट्रक्चर नाहीं व लॉगीस्टिक नाही,चीन मध्ये ते चांगले आहे त्यामुळे चीन जी गरज जगाची पुरवतो ती भारताला संधी असून पण पुरवता येणार नाही
2.भारताला आता इन्फ्रास्ट्रक्चर वर भर देऊन ते वाढवण्याची संधी आहे पण बँकांचा अनुउत्पादक कर्ज वाढल्याने व ifsl घोटाळा मुले इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पला ला कर्ज देणे थांबले आहे त्यामुळे त्या क्षेत्राची अजून पिछेवत होऊन भारताला जागतिक व्यापाराची संधी उचलता येणार नाही
3.चीनची वाढ धीमी झाल्यामुळे त्याच्या उत्पादनावर अवलंबून असलेल्या भारताला पण त्याचा फटका बसणार
4. भारताचा रुपया हा घसरत चालल्यामुळे आपल्याला अभियांत्रिकी गोष्टी महाग मिळत आहे त्यामुळे आपल्या उत्पादनाची उत्पादन किंमत वाढत आहे त्यामुळे परदेशात त्या विकले जाण्याची संधी कमी आहेत
5. भारताकडे अजून कुशल मनुष्यबळची वानवा आहे , नास्कॉम च्या सर्वेनुसार भारत मध्ये फक्त IT सेक्टर मधेच 1 लाख कुशल मनुष्यबळचा तुटवडा आहे
6 अमेरिकेने बंदी आणल्यानंतर चीन आता भारत सारखे मार्केट हस्तगत करण्यासाठी स्वस्तात भारतात डम्पिंग करू शकतो व  ते स्थानिक उद्योगांना  मारक ठरू शकते
487 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.