
‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने जाणून घेऊयात महिलांच्या या १० कायदेशीर हक्कांबद्दल…
नमस्कार, ठाणे लाईव्हच्या समस्त महिला प्रेक्षकवर्गाला ‘जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !’
स्त्री ही शक्ती, समृद्धी आणि सद्बुद्धी आहे, तरीही समाजातली काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे तिच्यावर अनेक मर्यादा लादण्यात आलेल्या आहेत. ‘स्त्री’च्या सुरक्षेसाठी ‘स्त्री’वरच मर्यादा ! हास्यस्पद आहे नाही का ? तरीही मुकाटयाने स्त्रियांनी आजवर या सगळ्या मर्यादा जपल्या, पण त्याचाही समाजातल्या त्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर काही परिणाम झालाच नाही. आजही ती प्रवृत्ती आपल्यला आपल्या समाजात पाहायला मिळतेच, पण समाधानाची बाब ही आहे की, या वाईट प्रवृत्तीवर वचक बसवणारे काही कायदेशीर हक्क आजच्या स्त्रीवर्गाला देण्यात आले आहेत. या ‘स्त्री शक्ती’ची शस्त्र आणि ढाल बनून काम करतात हे १० कायदेशीर हक्क आणि या हक्कांबद्दल तुम्ही जाणून घ्यायलाच हवं.
१) मोफत कायदेशीर मदत मिळणं हा स्त्रियांचा हक्क आहे.
२) जर कामाच्या ठिकाणी गैरवर्तन केलं जात असेल, तर त्या विरुद्ध संरक्षण मिळणे हा कायदेशीर हक्क स्त्रियांना दिला गेला आहे.
३) महिलांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जात नाही तसेच चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जायचं झाल्यास महिला आपला वकील आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतात.
४) कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही.
५) महिलांनी दाखल केलेली कोणतीच FIR पोलीस नाकारू शकत नाहीत.
६) महिला ई-मेलद्वारेही FIR दाखल करू शकतात.
७) महिला कधीही FIR दाखल करू शकतात. त्यावर वेळेची कुठलीच मर्यादा नाही.
८) महिलांचा जबाब नोंदवताना त्यासंदर्भीची माहिती गुप्त ठेवली जाते.
९) महिलेची परवानगी नसल्यास तिची ओळख आणि माहिती गुप्त ठेवण्यात येते.
१०) महिलेवर अत्याचार झाला असल्यास, त्या महिलेचे शोषण झालं आहे ही बाब डॉक्टर असंच तोंडी सांगू शकत नाहीत त्यासंदर्भीचं संपूर्ण लिखित एप्लिकेशन देणं डॉक्टरांसाठी बंधन कारक असतं.
312 Views