भविष्यात अजून घसरू शकते स्टॉक मार्केट ? वाचा काय असू शकतात स्टॉक मार्केट घसरण्याची कारणे

मागील महिन्यापासून स्टॉक मार्केटमध्ये उतरण होत आहे , कितीतरी लाख कोटींचे नुकसान आतापर्यंत गुंतवणूकदारांना झाले आहे, ही घसरण थांबून परत कधी स्टॉक मार्केट वर जाईल याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे, पण तात्कालीन व भविष्यातील परिस्थिती बघता स्टॉक मार्केट हे अजून खालीच जाईल असे वाटते त्याला पुढील कारणे आहेत
1. अमेरिकन गुंतवणूकदारांचा अमेरिकेत झालेल्या आर्थिक बदलामुळे भारतीय स्टॉक मार्केट मधून पैसे काढण्याचा ओघ सुरू आहे त्यामुळे स्टॉक मार्केट वर विक्रीचा दबाव येत आहे .
2. नॉन बँकिंग वित्त पुरवठा कंपन्याना तरलतेचा व ताणयुक्त मालमत्तेचा प्रश्न सतावत आहे त्यामुळे त्यांचे शेअर किमती अजून कमी होऊ शकतात.त्याचा परिणाम आपोआप मार्केट वर होणार.
3.अडचणीत असलेल्या नॉन बँकिंग वित्त पुरवठा कंपन्यांनी वित्त पुरवठा कमी केल्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या ऑटो , रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आली आहे.
4.भविष्यात डॉलर च्या तुनलेत रुपया हा 80 पर्यंत घसरू शकतो. रुपया घसरला की चालू तूट वाढणार.
5. पाऊस ठीक न झाल्यामुळे अन्न धान्याचे प्रमाण कमी होऊन महागाई वाढू शकते.महागाई वाढली की कर्जे महाग होतात त्याचा परिणाम कंपन्याच्या नफ्यावर होतो.
6. तीन राज्यात निवडणूक असल्यामुळे सरकार मत पेटी आकर्षित करण्यासाठी शेती कर्ज माफ करणे, अनुदान वाढवणे असे घोषणा करू शकते त्यामुळे वित्तीय तूट वाढू शकते.
7 .जर निवडणूकांचे निकाल सरकारच्या विरोधात गेले तरी मार्केट पडू शकते.
8. अमेरिकेसोबत आपण सशास्त्र करार न केल्यामुळे व इराण कडून इंधनाचा पुरवठा सुरू ठेवल्याने अमेरीका भारतावर tariff वार पुकारू शकते , त्याचा परिणाम IT व फार्मा कंपन्यांवर होऊन स्टॉक मार्केट आणखी पडू शकते.

456 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.