Wed. Mar 29th, 2023

‘कळवा, मुंब्र्यात मोकळ्या जागा राहिल्या नाहीत’- डॉ. जितेंद्र आव्हाड

'कळवा, मुंब्र्यात मोकळ्या जागा राहिल्या नाहीत'- डॉ. जितेंद्र आव्हाड

मोकळी जागा मिळेल तिथे अनधिकृत बांधकामे, अशा प्रकारांमुळे कळवा, विटावा, खारेगाव, मुंब्रा परिसरात मोकळ्या जागा मिळणे कठीण आहे. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागा अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांच्या नजरेतून सुटणे म्हणजे मोठा प्रश्न आहे, अशा शब्दांमध्ये राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा, मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांबद्दल खडे बोल सुनावले. दुसरीकडे शहरातील मोकळ्या जागा वाचवून त्या ठिकाणी चांगली क्रीडा संकुले उभारण्यात येत असून चांगले विश्व उभे करण्याचे काम शहरातील नगरसेवकांकडून केले जात असल्याचे कौतुकही आव्हाड यांनी केले. कळवा येथे मुकुंद केणी क्रीडा संकुलाचे रविवारी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी बोलताना त्यांनी राजकीय फटकेबाजीही केली.

215 Views
Shares 0