कोकणासह ठाणे, मुंबईत ढगाळ वातावरण

बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्याचे रूपांतर आज सोमवारी चक्री वादळात होणार आहे आणि पुढील दोन दिवस हीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने आणि या ढगाळ वातावरणामुळे काही अंशी गारवा निर्माण झाल्यामुळे तापमान काही अंशाने कमी झालं आहे. 
 
गेले काही दिवस राज्यातील तापमानाचा पारा ४० पार जात होता, तर या ढगाळ वातावरणामुळे पुढील काही दिवस तरी तापमान ४० अंशा खालीच राहणार असून ठाण्यातील आजचे तापमान ३५ अंश असे असणार आहे. उन्हाच्या तडाख्याने भाजून निघणाऱ्या ठाणे, मुंबईकरांना या ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.  
676 Views
Shares 0