Sun. Feb 5th, 2023

ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी

ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट

ठाण्यातील कळवा भागात सिलेंडरचा स्फोट होऊन  4 कामगार जखमी झाल्याची दुःखद घटना घडली आहे. कळवा पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंग मागे शिवशक्ती नगरात एका चाळीतील भारत गॅस एजन्सीमध्ये ही घटना घडली आहे. रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास हा सिलेंडरचा स्फोट झाला. दुखापतग्रस्त कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी 1-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. घटनास्थळाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी या कामगारांची  चिंताजनक आहे.

दुखापतग्रस्त कामगारांची नावे :

1) सत्यम मंगल यादव (वय-20)
2) अनुराज सिंग (वय-29)
3) रोहित यादव (वय-20)
4) गणेश गुप्ता (वय-19)

1433 Views
Shares 0