ठाण्यात धवलसंगीत प्रतिष्ठान तर्फे मोफत नेत्र आणि आरोग्य शिबीर संपन्न.

ठाणे प्रतिनिधी:- ठाण्यात आज धवलसंगीत प्रतिष्ठान तर्फे मोफत नेत्र आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन ठाणे शहर(जि.) युवक काँग्रेस च्या उपाध्यक्षा सोनललक्ष्मी वी. घाग आणि काँग्रेसच्या ठाणे शहर (जि.) उपाध्यक्षा संगीता वीरधवल घाग यांनी केले होते.

या शिबिरात नाडी परीक्षण , प्रकृती परीक्षण , नेत्र चिकित्सा , ब्लड प्रेशर, डायबेटीस , रेटीना आणि ग्लुकोम चेक अप याबाबतीत सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.
प्रभागातील 200 पेक्षा जास्त नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.

 

या शिबिराला काँग्रेस चे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे , राजेश जाधव ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य) , राम भोसले ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य ), ठाणे शहर उपाध्यक्ष सुनील शिंदे , ठाणे शहर सचिव मंजूर खत्री ठाणे शहर (जि.) युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष झिया शेख , ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष स्वप्नील भोईर, युवक काँग्रेस चे कळवा मुंब्रा अध्यक्ष वसीम हजरत , महेंद्र म्हात्रे (प्रसिद्धीप्रमुख ठाणे शहर जिल्हा ), संदीप शिंदे, मेहेर चौपाने, विनीत तिवारी ,यज्ञेश वाडेकर, अजित ओझा , प्रिया पांचाळ, अतिक लबडे, आदी मान्यवरांनी भेट दिली.

309 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.