थंडीचा कडाका वाढलाय.. घ्या ही काळजी..

ठाणे लाईव्ह टीम :

पंधरा दिवसांपूर्वी असणारी कडाक्याच्या थंडीचे प्रमाण आता 4-5 दिवसांपासून वाढतच चालले आहे. मात्र या थंडीने शहरवासीय पूर्णपणे गारठून टाकले आहे. पारा 13अंशावर आला असून वाढत्या थंडीने चहा टपऱ्यांवर गर्दी वाढत असून, तसेच गेल्या काही दिवसांत गुंडाळून ठेवलेल्या कानटोप्या, हातमोजे, स्वेटर पुन्हा बाहेर काढले आहेत. शरीराला ऊब मिळावी म्हणूनच बहुदा सर्वच लोक असे कपडे घालूनच घराच्या बाहेर पडत आहेत.

त्याचप्रमाणे अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी,खोकल्याचे रुग्ण देखिल खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

★थंडीपासून ही घ्या काळजी…

● वातावरण कोरडे असल्यानी धुळीचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडावर स्कार्फ किंवा रुमाल बांधावा.

● वातावरणात कोरडेपणा असल्याने त्वचेची काळजी घ्या.

● तसेच हिवाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाण्यापेक्षा ताजे अन्न खावे.

366 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.