नव्या टायगरबद्दल दिशा पाटनीने दिले स्पष्टीकरण.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

नुकतंच अभिनेत्री दिशा पाटनीला आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. या गोष्टीमुळे दिशाला सोशल मीडियावर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आहेत. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने नीट उत्तर दिलं आहे.

दिशाने चाहत्यांच्या या प्रश्नांना योग्य उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, “मित्र जेवणासाठी एकत्र जाऊ शकत नाहीत का? मैत्री करताना आपण लिंगाचा विचार करत नाही. माझ्या फक्त मैत्रिणीच नाही तर मित्रही आहेत. प्रत्येकालाच मित्र व मैत्रिणीही असतात.” दिशा असंही म्हणाली की, मी असं करियर निवडलं आहे की जिथे मी कायम लोकांच्या नजरेत राहणार आहे. लोक नेहमी माझ्याबद्दल मतं बनवणारच आहेत. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही.” दिशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटामध्ये तिने एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

179 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.