सेक्रेड गेम्स’ च्या चाहत्यांसाठी खास बातमी.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरच्या तुफान गाजलेल्या वेबसीरिजनंतर याचा दुसरा पार्ट अर्थात ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण ‘सेक्रेड गेम्स 2’ची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर ‘सेक्रेड गेम्स 2’साठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.‘सेक्रेड गेम्स 2’ चालू महिन्याच्या म्हणजेच जूनच्या अखेरिसपर्यंत प्रसारित होईल, असे मानले गेले होते. पण आता हे सीझन पाहण्यासाठी ऑगस्टपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय. याचे कारण म्हणजे सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी. होय, या दोन्ही स्टार्सच्या तारखांमुळे ‘सेक्रेड गेम्स 2’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे.

163 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.