‘जवानी जानेमन’ चित्रपटात झळकणार करीना आणि सैफची जोडी

 

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर खान आणि ‘नवाब’ सैफ अली खान ही जोडी कलाविश्वातील हॉट जोडी म्हणून ओळखली जाते. चाहत्यांमध्येदेखील ही जोडी तितकीच लोकप्रिय आहे. या दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी ही जोडी काही ठराविक चित्रपटांमध्ये एकत्र झळकली होती. मात्र लग्नानंतर ते फार कमी वेळा एकत्र आले. त्यामुळे या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून सैफ आणि करिना लवकरच स्क्रीन शेअर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या सैफ त्याच्या आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत करिना कपूरदेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये करिना सैफ साकारत असलेल्या भूमिकेची पूर्वपत्नी अथवा एक्स गर्लफ्रेंडची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ४ वर्षानंतर करिना एका महत्वपूर्ण आणि दमदार भूमिकेत दिसून येणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे.

दरम्यान, सैफ आणि करिना त्यांच्या लाडक्या लेकासोबत तैमुरसोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. या सुट्टीमधील काही फोटोदेखील ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सुट्टी संपल्यानंतर हे दोघंही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे वळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

140 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.