योगा ‘डे’ निमित्त नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन उतरवणार शेकडो रिक्षा चालकांचा विमा .

 

21 जूनला हजारो नवी मुंबईकर एकाच ठिकाणी एकाच वेळी करणार योगा !!

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

आजच्या दैनंदिन व्यस्त जीवनामध्ये स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी योग मदत करते. त्यामुळे योगाची समाजातील विविध घटकांना योग्य माहिती मिळावी, त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना शिकता यावी. यासाठी नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन तर्फे 21 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम सपंन्न होणार आहे. सिडको एकजिबिशन सेंटर, सेक्टर -30 वाशी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे.

नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन मागील काही
वर्षापासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे.
ह्या वर्षी योग दिनाच्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा म्हणून भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सिडको आणि आर्ट ऑफ लिविंगचे ही सहकार्य लाभले आहे.

ह्या वर्षी 21 जूनला 5 वा आंतरराष्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. मुंबई व नवी मुंबई पररिरातील 64 शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्था आपल्या 2000 विद्यार्थी आणि सदस्यांसोबत सहभागी होत आहेत. नवी मुंबई मधील प्रख्यात योग प्रशिक्षण संस्था आणि त्यांचे तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत. 60 योगप्रशिक्षक हे
नागरिकांना योग प्रशिक्षण देतील. ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या समाजातील अल्प उत्पन्न गटांना वर्षभर मोफत आरोग्य चिकित्सा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या 100 रिक्षाचालकांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती योजने अंतर्गत विम्याचा हप्ता नवी मुंबई सिटिझन्स फाउंडेशन ही संस्था भरणार आहे.
म्हणजे रिक्षाचालकांना मोफत विम्याचा लाभ घेता येईल .

97 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.