नितीन नांदगावकरांचा जनता दरबार आता ठाण्यामध्ये??

मनसेच्या महेश कदम यांनी घेतला पुढाकार.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

नितीन नांदगावकर महाराष्ट्र गडावरील जनता दरबार ह्यापुढे बंद करत आहेत. लवकरच नवीन जागी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जनता दरबार सुरू करेन. असे त्यांनी
फेसबुक पोस्ट द्वारे सांगितले. ‘अन्यायाच्या विरोधात मी सदैव लढत राहणारच.गोरगरीब जनतेला मी वाऱ्यावर सोडणार नाही. पण जिथे जिथे अन्याय होईल तिथे मी उभा राहणारच. थोडा वेळ लागेल मला जागा शोधायला, पण ती आपल्या सर्वांची हक्काची जागा असेल जिथे मी तुम्हां सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहीन.
जनता दरबार हा गोरगरीब जनतेसाठी आहे आणि तो असाच चालू राहील फक्त त्याची जागा आणि वेळ लवकरच सांगेन , कारण त्यासाठी जागा आणि भांडवल उभे करावे लागेल.पैसा ही लागेल’! असे नितीन नांदगावकर यांनी सांगितले.

त्यावर जनता दरबार ही काळाची गरज आहे, जर आदरणीय नितीन नांदगावकर साहेबांना जागेअभावी दरबार बंद करायची वेळ येत असेल तर, आम्ही ती वेळ येऊन देणार नाही. असे ठाणे शहरातील मनसेचे कोपरी पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश परशुराम कदम यांनी सांगितले आहे. ‘ठाण्यात जनता दरबार भरावा, यासाठी आपल्याला 5000 चौरस फूट जागा उपलब्ध करून देऊ. नितीन नांदगावकर यांची गोरगरीब जनतेला व संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे असे महेश कदम यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे नमूद केले
आहे.
आता नितीन नांदगावकर यावर काय निर्णय घेतात हे येणारा काळच ठरवेल.

3,490 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.