हाजुरी, लुईसवाडीतील रहिवाशांना मिळणार ‘शुद्ध पाणी’. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारणार.

हाजुरी, लुईसवाडीतील रहिवाशांना मिळणार ‘शुद्ध पाणी’.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारणार.
आयुक्तांसह शिवसेना नगरसेवक अशोक वैती यांच्या पाठपुराव्याला यश.

ठाणे, दि. १६ (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तसेच ठाणे पालिकेच्या वतीने ठाण्यातील हाजुरी, लुईसवाडी, रामचंद्र नगर आणि आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या विना प्रक्रिया पाण्याचा पुरवठा बंद करून आता प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्याभरात नवी जलजोडणी पूर्ण होताच शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरु होणार आहे. या समस्येबाबत शिवसेना नगरसेवक अशोक वैती यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे ठाणे पालिका आयुक्तांच्या विशेष प्रयत्नांनी या योजनेला आकार येणार असून शुद्ध पाण्यापायी रहिवाशांची अनेक वर्षांची समस्या मार्गी लागणार आहे.

हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर या परिसराला मागील तीस वर्षांपासून मुंबई पालिकेच्या जलवाहिनीच्या माध्यमातून सुमारे २२.५० दश लक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे दर पावसाळ्यात या परिसरात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांकडून होत असे. याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेवक, माजी महापौर अशोक वैती यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या दूषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती वैती यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे मांडली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंबई पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार पालिकेच्या वतीने नवीन जलजोडणी आकार व अनामत म्हणून ३ कोटी १६ लाखांची अनामत रक्कमही भरण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांनी अशोक वैती यांचे आभार मानले आहेत.

141 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.