ठाण्यातून स्वामी फाऊंडेशनचे महेश कदम पुरग्रस्तांसाठी पाठविणार 10 हजार लिटर फिनाईल आणि ब्लिचिंग पावडर.

ठाण्यातून स्वामी फाऊंडेशनचे महेश कदम पुरग्रस्तांसाठी पाठविणार 10 हजार लिटर फिनाईल आणि ब्लिचिंग पावडर.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्ष सहकार्य करत आहेत. त्यात एका सामाजिक संस्थेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे स्वामी फाऊंडेशन.

स्वामी फाऊंडेशन चे सदस्य पहिल्या दिवसापासून पूरग्रस्त भागातील नागरिकांना चहा, जेवण आदी गोष्टींची मदत करीत आहेत.
आता पाऊस कमी झाला असला तरी पाणी ओसरलेले नाही आणि पाणी ओसरल्यानंतर या सर्व भागांमध्ये मोठया प्रमाणात रोगराई पसरण्याची भिती लक्षात घेऊन ठाण्यातून स्वामी फाऊंडेशन चे महेश कदम पुरग्रस्तांसाठी 10 हजार लिटर पेक्षा जास्त फिनाईल आणि ब्लिचिंग पावडर पाठविणार आहेत.

ठाण्यातील स्वामी फाऊंडेशन या संस्थेद्वारे वेळोवेळी गरजवंतांना सहकार्य करण्याचे आणि पाठबळ देण्याचे काम चालत आले आहे. आता हे सर्व साहित्य घेऊन संपूर्ण स्वतः संस्थापक महेश कदम आणि स्वामी फाऊंडेशन ची टीम लवकरच ठाण्यातून रवाना होणार आहेत.

1,097 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.