जाणून घ्या का साजरी केली जाते बकरी ईद!!

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी
‘बकरी ईद’ किंवा ‘ईद उल जुहा’ याचा अर्थ म्हणजे बलिदानाची ईद. मुस्लिम समाजाचे लोक रमजान हा पवित्र महिना संपल्यानंतर जवळपास ७० दिवसांनी हा सण साजरा केला जातो. इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम आपला मुलगा हजरत इस्माईल याला या दिवशी ईश्वराच्या आदेशानुसार कुर्बान करण्यासाठी घेऊन निघाले होते. तेव्हा अल्लाहने त्यांच्या मुलाला जीवदान दिले. त्याची आठवण म्हणून ‘बकरी ईद’ हा सण साजरा केला जातो.

‘बकरी ईद’ दिवशी मुस्लिम नागरिकांच्या घरी काही चौपाया जनावरांची खास करून बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर ते मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरिबांना व अनाथ, आप्त व नातेवाईकांना वाटप केले जाते. तसेच रंगीबेरंगी नवीन कपडे, सुगंधी दरवळ, खमंग आणि चमचमीत पदार्थ आणि एकमेकांना ईद मुबारक असे म्हणत अलिंगन देत शुभेच्छा देत असे. तर या दिवशी पाहुण्यांच्या गर्दीने प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरातील वातावरण उत्साहाचे असते.

231 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.