ठाण्याचे अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्या विरोधात मनसेचे महेश कदम उतरण्याची शक्यता.

ठा. म. पा. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केलेल्या कारवाईच्या मागणीनंतर मनसेचे विभाग अध्यक्ष महेश कदम हे ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यावरच कारवाईची मागणी करणार आहेत.

ठाणे लाईव्ह :- महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती. ती विझवण्यासाठी गेलेल्या टँकरमध्ये पाणीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. परंतु, असे असतानाही अग्निशमन विभागाने तयार केलेल्या अहवालात त्यावेळेस पाइपमध्ये पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

पण विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने याविषयी जो अहवाल तयार केला आहे, त्यामध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा पाठवलेल्या टँकरमध्ये पाणी होते, असा हवाला दिला आहे. पण तसा अहवाल तयार केला नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली. तसेच ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळेस पहिल्या टँकरमध्ये पाणी नसल्याचेही त्यांनी मान्य केले.

महेश कदम यांनी ठाणे लाईव्ह शी बोलताना सांगितले या अहवालाविषयी माहिती घेण्यात येणार आहे . आणि अशी खोटी माहिती सादर करून जर अग्निशमन अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न होणार असेल तर मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि असे झाले नाही तर शशिकांत काळे यांच्याविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महेश कदम यांनी दिला आहे.

1,931 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.