ठाणे शहरातील दिव्यांगांसाठी मनसेचे महेश कदम सरसावले.

ठाणे शहरातील दिव्यांगांसाठी मनसेचे महेश कदम सरसावले.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी
ठाण्यातील दिव्यांगांच्या मदतीसाठी मनसेचे विभाग अध्यक्ष महेश कदम सरसावले आहेत.
ठाणे शहरातील दिव्यांग व्यक्तींना वास्तव्याचा दाखला तसेच अधिवास दाखला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा यासाठी ठाण्यातील मनसेचे विभागाध्यक्ष महेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापौरांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

ठाणे महानगरपालिकेने दिव्यांगांकरिता 252 घरं उपलब्ध केली आहेत. त्याकरिता घराच्या पात्रतेसाठी स्थानिक रहिवासी दाखला आणि अधिवास दाखला ही दोन महत्वाची कागदपत्रे मागवली असून त्याकरिता दिव्यांग सेतू कार्यालय आणि सरकारी कार्यालयात अर्ज केलेले आहेत. यानंतर 20-30 दिवसात मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक दिव्यांग दाखला मिळेल कि नाही या चिंतेत व्यथित आहेत. यासंबंधित अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना लागणारे दाखले 7 दिवसात उपलब्ध करून देण्याची विनंती ठाण्यातील मनसेचे कोपरी – पाचपाखाडी विभागाध्यक्ष महेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांना केली आहे.

430 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.