शिवसेना नगरसेवक भूषण भोईर यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

शिवसेना नगरसेवक भूषण भोईर यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

भूषण भोईर यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता.

ठाणे लाईव्ह :- तक्रारदार नीरज काबाडी यांनी तक्रार दिल्याप्रमाणे बाळकुम येथील जुना सर्वे क्रमांक 262, नवीन सर्वे क्रमांक 233/1 आणि २३३/२ या महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर 2007 मध्ये साई जलाराम बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे भागीदार नवीन विरेंद्रसिंह , भूषण देवराम भोईर , लक्ष्मण साबा जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारे कायदेशीर परवानगी न घेता एक तळमजला अधिक सात मजल्याची व दोन तळमजला अधिक पाच मजल्याची अशी साई दर्शन कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधली आहे.

भूषण देवराम भोईर यांचे वडील देवराम भोईर व मोठा भाऊ संजय देवराम भोईर हे सदरची इमारत बांधते वेळी ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी सदरची इमारत बांधते वेळी महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही किंवा नकाशा मंजूर करून घेतलेला नाही . त्यामुळे भाऊ आणि वडील नगरसेवक असल्याचा गैरफायदा भूषण भोईर यांनी या अनधिकृत बांधकाम करताना घेतल्याचा आरोप देखील तक्रारदार नीरज काबाडी यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.

तसेच भूषण भोईर यांच्या पत्नी सपना भूषण भोईर आणि लीना लक्ष्मण जाधव यांच्या नावावर असलेल्या बार आणि रेस्टॉरंट साठी बार चे लायसन्स मिळविण्यासाठी देखील कागदपत्र खोटी सादर करण्यात आलेली आहे असा आरोप देखील तक्रारदाराने तक्रारींमध्ये केलेला आहे

417, 420 ,423, 467,468, 471, 474, 34 या कलमांतर्गत भूषण देवराम भोईर, त्यांच्या पत्नी सपना भूषण भोईर, नवीन वीरेंद्रसिंह, लक्ष्मण जाधव, लीना लक्ष्मण जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

2,075 Views

2 thoughts on “शिवसेना नगरसेवक भूषण भोईर यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.