माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं आम्ही ऐकणार नाही : जितेंद्र आव्हाड.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  हे स्वत: उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत.

ठाणे लाईव्ह :-  माफ करा साहेब यावेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे ऐकणार नाही, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार   हे स्वत: उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.  मात्र जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचा हा आदेश अमान्य असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवारांनी ट्विट करुन कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं.

“काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे. सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे”, असं ट्विट शरद पवारांनी केलं.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या ट्विटला कोट करत, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

माफ करा साहेब यावेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार.  तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय, वय वर्ष 79, हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय आहे, उद्यासाठी माफ करा, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

1,106 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.