ठाणे शहर मतदारसंघात अविनाश जाधव यांना काँग्रेसचा “मनसे” पाठिंबा??

ठाणे शहर मतदारसंघात अविनाश जाधव यांना काँग्रेसचा मनसे पाठिंबा??

ठाणे लाईव्ह :- ठाणे शहर मतदार संघातील निवडणुक आता चुरशीची झाली आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव हे देखील उमेदवारीच्या रिंगणात आहेत. .
राष्ट्रवादी काँग्रेसने सुहास देसाई यांना उमेदवारी दिली होती परंतु पक्षहिताचे कारण देत त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतल्यामुळे मनसेची आणि राष्ट्रवादीची आधीच या निवडणुकीत छुपी युती झालेली आहे हे स्पष्ट झालेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असतानाच आता काँग्रेसही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांना पाठिंबा देण्याच्या पवित्र्यात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
जर काँग्रेसनेही अविनाश जाधव यांना पाठिंबा दिला तर ही निवडणूक आणखीन रंगतदार होईल यात शंका नाही.

2,428 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.