Wed. Mar 29th, 2023

काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घरावर आणि ऑफिस वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा.


काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घरावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा टाकल्याचं सांगितलं जातं. सूरज परमार आत्महत्या प्रकरणात विक्रांत चव्हाण यांना पोलीसांनी अटक केली होती. नंतर त्यांची न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज त्यांच्या घरावर छापा टाकला. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं सांगितलं जातं.

477 Views
Shares 0