Wed. Mar 29th, 2023

राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे.

?नाशिकला असताना मी म्हणलं होतं की १८ तारखेच्या सभेच्या वेळेला वीज, केबल बंद केल्या जातील, नेमकं तसंच घडलंय. अनेक ठिकाणच्या सभेच्या प्रसारणावर आडकाठी आणलीय.

?सरकारला सभेची भीती वाटते यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दिसून येते.
२०१४ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुका लढवताना ब्लूप्रिंट आणली होती, २०१७ ला गुजरात निवडणूक लढवताना भाजपवाले ब्लुफिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवत आहेत.

?हार्दिक पटेलच्या सीडी काढणारे फक्त आंबटशौकीन.

?राहुल गांधींचा उल्लेख पप्पू म्हणून केला पण आज त्याच राहुल गांधीविरोधात निवडणूक लढवायला अख्खा भाजप पक्ष मैदानात उतरलाय. पप्पू आहेत ना मग घाबरताय का एवढे त्यांना?

?अविनाश जाधवच्या जामिनासाठी १ कोटी मागितले. कशाचे एक कोटी मागताय? त्यावर ठाण्याचे पोलीस कमिशनर म्हणतात की मी ठरवेन किती जामीन मागायचा ते.

?आयुक्त परमवीर सिंगांना मी सांगतो हिम्मत असेल तर आया-बहिणींवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांना अटक करून दाखवा, त्यांच्याकडे कोटीचे जामीन मागून दाखवा.

?आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी जी आंदोलनं केली ती आंदोलनं कायदा मोडणाऱ्यांच्या विरोधात होती आणि तरीही तुम्ही आमच्यावर कारवाई करणार?

?फेरीवाल्यांना हटवणे हे आमचं काम नाही, ते सरकारचं काम आहे पण ते सरकारला जमलं नाही म्हणून आम्ही केलं. आज जी मोकळी स्थानकं दिसत आहेत ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या आंदोलनामुळेच.

?पोलिसांवर हात टाकणाऱ्या गुंडाला माझ्या मारुती दळवी नावाच्या महाराष्ट्रसैनिकाने फटकवलं. असा जेव्हा पोलिसांवर हात टाकला जातो तेव्हा कुठे असतो परमजित सिंग?

?पोलिसांवर हात उचलला गेला तेव्हा आमच्या महाराष्ट्रसैनिकाने त्याला जाऊन मारलं, मग का नाही पोलिसावर हात उचलणाऱ्यावर 1 कोटीचा दावा ठोकला ?

? भविष्यात या परमजीत सिंगवर केस पडली तर आम्ही २०० कोटींचा दावा ठोकू.

?काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि इतर सर्व पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकटं पाडलं जातंय.

?महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकटं पाडायचा प्रयत्न केला जातोय.पण तुम्ही आम्हाला एकटं पाडूच शकत नाही कारण आज आमच्यापाठी महाराष्ट्राची जनता उभी आहे.

?आज सर्वत्र लोकं म्हणतायत की रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता आम्ही कधी पाहिलाच नव्हता. इतकी मोकळा परिसर कधी अनुभवलाच नव्हता.

?दरवर्षी फेरीवाल्यांकडून हप्ता २ हजार कोटींचा घेतला जातो आहे. यात एवढी मोठी आर्थिक उलाढाल आहे, म्हणून हे सगळे राजकीय पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने उभे आहेत.

?सरकारतर्फे २ मराठी सिनेमांना बंदी घातली त्यावर का नाही नाना पाटेकर बोलले?

?टोलच्या आंदोलनाचं काय झालं असा काही पत्रकार मला विचारत असतात पण भाजप-शिवसेनेने २०१४ ला टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं होतं, त्यांना का नाही विचारलं जात की कधी बंद होणार टोल? त्यांना का नाही विचारत तुमचे काय आर्थिक लागेबांधे आहेत टोलच्या राजकारणात?

?मनसेच्या आंदोलनामुळेच टोल बंद झाले, मात्र आम्हाला मांडवली केली म्हणून प्रश्न विचारतात.

?आमच्या आंदोलनानंतर राज्यातील अनधिकृत टोलनाके बंद झालेच पण ६४ अधिकृत टोलनाके बंद झाले.

?शहरांमध्ये मराठी पाट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झळकू लागल्या.

?हे आंदोलन आम्हाला पुन्हा हातात घ्यावं लागेल असं दिसतंय कारण अजून काही लोक सुधरत नाहीयेत.

?वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी ४ लाख विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा लादली जात होती. तेव्हा थेट पंतप्रधानांशी बोलून प्रश्न सोडवला.

?माझ्या हातात ना राज्य सरकार, ना केंद्रात माझा कुणी प्रतिनिधी नाही, पण त्यावेळेलाही पालक माझ्याकडे आले का तर महाराष्ट्र सैनिकांच्या ताकदीमुळेच ना.

?पुण्यात फेरीवाल्यांच्या आंदोलनात १६ महाराष्ट्र सैनिकांना अटक केली, त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे टाकले. त्यांची आज इतक्या दिवसांनी आज सुटका झाली.

?मी सरकारला हेच सांगू इच्छितो की तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाहीत, उद्या आमची सत्ता येईल तेव्हा तुमच्यावरही दरोड्याच्या केसेस पडू शकतात.

?उच्च न्यायालयाने अनधिकृत फेरीवालयांच्या विरोधात जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात कोणाला तरी उभं करून सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सरकारची तयारी सुरु आहे असं मला सरकारमधल्या उच्चपदस्थ व्यक्तीने सांगितलं.

?म्हणजे काय तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून पुन्हा जनतेच्या छाताडावर फेरीवाले बसणार.

?आझाद मैदानात रझा अकादमीच्या मोर्च्याच्या वेळी पोलीस भगिनींवर त्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्यांची छेड काढली, त्यावेळी त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच मोर्चा काढला होता.

?आमच्यावरची कलमं कमी करा यासाठी पोलिसांच्या बाजूने उभा राहत नाही, पोलीस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी पोलिसांचे प्रश्न मांडतो आम्ही.

?कित्येक वर्ष गुजराती या शहरांत गुण्यागोविंदाने राहत होते, तेव्हा कधी नाही मांसाहाराचा वास येत नव्हता, भाजपचे सरकार आल्यापासून या सगळ्या गोष्टी कश्या सुरु झाल्या? जैन-मुनी पर्युषण काळात मांस बंदी करा म्हणून त्या मुल्ला-मौलवींसारखे फतवे कसे काय काढू शकतात ?

?१५ वर्षांपूर्वी जो समाजात सलोखा होता तो जर पुन्हा येणार असेल तर राज ठाकरेंचा हात पुढे येईल पण जर काही वेडवाकडं करायचा प्रयत्न केलात तर माझाच हात वर जाईल.

?तुम्ही जर आरे केलंत तर आमच्याकडून कारे येणारंच.

?बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे कारण त्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाहीयेत. मी मोदी पंतप्रधान झाल्यावर म्हटलं होतं की आता गुजरातचा नाही देशाचा विचार करा.

?बुलेट ट्रेन सुरु करताना अहमदाबादचा विचार कसा येतो? जर मोदींना गुजरातचं प्रेम वाटू शकतं तर राज ठाकरेला महाराष्ट्राचं प्रेम का वाटू नये?

?संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्याची जखम आजही भळभळतेय या गुजरातच्या मनात. म्हणूनच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरु आहे.

?फक्त मोदींच बुलेट ट्रेनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोट्यावधीचे कर्ज काढलं जातंय आणि या कर्जाची परतफेड देशवासीयांना करायची, का?

?२ महिन्यांपूर्वी माझ्या मित्राच्या घरची लोकं वाराणसीला गेले होते, तिथे गंगेत बोटीत फिरताना प्रेतं वर येत होती, वाराणसी मोदींचा मतदारसंघ पण तुम्हाला तोच स्वच्छ ठेवता येत नाही पण ते देखील तुम्हाला जमत नाही आणि तुम्ही कसल्या स्वच्छ भारताच्या गप्पा मारताय?

?राजीव गांधींनंतर इतकं बहुमत मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, वाटलं होतं की काही बरं करतील पण नाही ते आज नको त्या गोष्टीत गुंतलेत.

?खरंतर या देशाची सर्वात मोठी समस्या लोकसंख्या आहे त्या समस्येला पंतप्रधान मोदींनी हात घातला पाहिजे.

?२०१४च्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी म्हणाले होते की आम्ही सत्तेत आलो की बांग्लादेशी घुसखोरांना बॅग भरून बाहेर पडावं लागेल, पण काहीच घडलं नाही.

?महाराष्ट्र जातीच्या राजकारणात गुंतलाय, आपल्याला जातीच्या राजकारणात गुंतवण्याचा डाव सुरु आहे आणि याला खतपाणी घालणारे महाराष्ट्रातलेच नेते आहेत.

?कोणत्याही पूजेला माझा विरोध नाही पण छट पूजेच्या माध्यमातून रस्त्यावर ताकद दाखवायचा प्रयत्न सुरु आहे.

?हातातली जमीन गेली की कपाळावर हात मारण्याशिवाय काही उरणार नाही. जगातली सगळी युद्ध ही जमिनीच्या मालकीसाठी म्हणजे भूसंपादनासाठी झाली आहेत.
भूगोलाशिवाय इतिहास नाही. आज आपण महाराष्ट्राची जमीन सहजपणे इतरांच्या हातात देतोय.

?महाराष्ट्रातला मुसलमान जिथे राहतो, तिथे दंगली होत नाहीत, बाहेरचे जिथे येतात तिथेच दंगली होतात.

?आपलं राज्य वाचवायचं असेल तर सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र या.

?महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार, पण बाहेरचे येऊन डोळ्यासमोर रोजगार घेऊन जात आहेत.

?बँकांचे व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत.

?कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगतात की कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड भाषेत बोलावं लागेल, अशी हिम्मत आहे का देवेंद्र फडणीवसांमध्ये?

?प्रत्येक राज्याला आपल्या राजभाषेबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा, आम्हीच काय घोडं मारलंय?

?समृद्धी महामार्गातून जर महाराष्ट्राची समृद्धी होणार असेल तर मला मान्य आहे पण महाराष्ट्राचा पैसा वापरून जर समृद्धी महामार्ग करून महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न केलात तर मी समृद्धी महामार्ग तोडेन.

?आमच्या जिजाऊ महाराजांचा जन्म विदर्भातला तर शिवाजी महाराजांचा पुण्यातल्या. स्वतंत्र विदर्भ करून तुम्ही माय-लेकाची ताटातूट करणार?

? आपल्या महाराष्ट्राला चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय. मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की बेसावध राहू नका. सदैव सतर्क राहा.

533 Views
Shares 0