
टीएमटीचा आणखी एक नवा मार्ग. ठाणे ते मंत्रालय ‘वातानुकूलित’ प्रवास.
कॅडबरी ते मंत्रालय अशी बस सेवा आजपासून सुरू झाली आहे. ठाण्यातून आज अनेक प्रवासी नोकरीच्या निमित्तानं मंत्रालय, मुंबईत जात असतात. त्यांच्यासाठी अशी बस सेवा सुरू करावी अशी मागणी होती. आता अशी बस सेवा सुरू झाल्यामुळं या सेवेचा अनेक प्रवाशांना फायदा होणार असल्याचं परिवहन सभापती अनिल भोर यांनी सांगितलं. या बसच्या कॅडबरी ते मंत्रालय सकाळी ८, ११.४० आणि ४ अशा ३ फे-या होणार आहेत तर मंत्रालय ते कॅडबरी जंक्शन सकाळी ९:३०, दुपारी १.१० आणि संध्याकाळी ६ अशा तीन फे-या होणार आहेत.
452 Views