राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांवरील १ कोटींचा दंड १ लाखावर!


ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळं अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांच्या हमी रक्कमेत पोलीसांनी घट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाण्यातील फेरीवाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांसह ७ पदाधिका-यांना या आंदोलनाप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना जामिनावर सोडताना अध्यक्षांकडे १ कोटीची तर इतर ६ पदाधिका-यांना २५ लाखांची हमी देण्यास सांगण्यात आलं होतं. या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आल्यानंतर न्यायालयानं याप्रकरणी स्थगिती दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शनिवारी झालेल्या सभेत या हमीवरून राज ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांवर जोरदार टीका केली होती. कोणत्या कायद्यानं पोलीस एवढ्या रक्कमेची हमी मागतात, पोलीसांवर हल्ला करणा-या हल्लेखोरांवर पोलीसांनी कधी एवढी कडक कारवाई केली का, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी आमची सत्ता येईल तेव्हा दोनशे चारशे कोटीचा दावा दाखल करू असा इशाराही दिला होता. त्यानंतर पोलीसांनी ही हमी रक्कम कमी केली असून आता सर्वांकडे प्रत्येकी १ लाख रूपयांची हमी मागितली आहे.

468 Views
Shares 0