मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, नेते राजू पाटील, अभिजीत पानसे यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, नेते राजू पाटील, अभिजीत पानसे यांच्यासह अन्य 7 जनांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेसाठी संपुर्ण ठाणे शहरात अनधिकृत बॅनरबाजी करण्यात आली होती. या विनापरवाना बॅनरबाजी / जाहिराती लावून, अतिक्रमण करून, शहर विद्रुपीकरण केल्याचा गुन्हा या मनसे कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे.

595 Views
Shares 73