
ठाणेकर तरुणांचे मिशन “QUIT TOBACCO”. भारत ते मलेशिया असा स्वतःच्या वाहनाने रोडने (6500कि.मी.) करणार प्रवास.
ठाण्यात रहाणार्या चार तरुणांनी ” QUIT TOBACCO” मिशनसाठी भारत ते मलेशिया असा प्रवास स्वतःच्या वाहनाने संपुर्ण रोडने (6500कि.मी.) करायचा निश्र्चय केला आहे. या 4 रविंद्र अस्लेकर, सुनिल मोदगी, सुनिल शिंदे आणि शंतनु खेडकर यांच्या प्रवासाची सुरुवात कॅडबरी नाका, ठाणे येथून झाली.
या चार जणांपैकी रविंद्र अस्लेकर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बरे झाले आहेत. त्यांना झालेला कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे झालेला होता आणि त्यांना हे व्यसन अगदी मृत्युच्या दारात घेउन गेले होते. पण रविंद्र अस्लेकर यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारातून बाहेर पडून भारत ते मलेशिया प्रवासाचा उद्देश फक्त प्रवास नसुन या तरुणांनी ” QUIT TOBACCO ” हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावा या उद्देशाने ही मोहिम आखली आहे.
मिळालेले नविन आयुष्य निर्व्यसनी राहून आनंदाने घालवण्याचा मानस व्यक्त केला आहे. आपल्यावर आलेले संकट अजुन कोणावर येउ नये म्हणुन त्यांना ” QUIT TOBACCO MISSION ” घेउन तंबाखुविरोधी प्रचार करण्यासाठी एक दिर्घ प्रवास करायचा निश्र्चय केला आहे.
यासाठी ठाणे येथुन सुरुवात करुन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणी मणिपूर अशी राज्य फिरून मणिपूर मार्गे —म्यानमार— थायलंड—मलेशिया असा प्रवास स्वतःच्या गाडीने करुन ” NO TOBACCO” साठी जास्तीतजास्त प्रसार करण्याचे या चौघांनी ठरवीले आहे.
सदर प्रवासासाठी हे चार जण निघाले असता आमदार संजय केळकर व नगरसेवक संजय वाघुले यांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा व निरोप दिला .
छाया : आदित्य देवकर.