नॅशनल रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाणेकर जिम्नॅशियमपटूंची विशेष कामगिरी.

ठाणे :- कलकत्ता येथे दिनांक 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या नॅशनल रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाण्यातील फिनिक्स जिम्नॅस्टिक ऑकॉडमीच्या जिम्नॅशियमपटूंनी विशेष कामगिरीने सुवर्णपदकांची लयलूट करीत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या सर्व जिम्नॅशियमपटूंना महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महापौर दालनात त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी सभागृहनेते नरेश म्हस्के, छत्रपती पुरस्कार विजेत्या व फिनिक्स जिम्नॉस्टिक ऑकॉडमीच्या पूजा सुर्वे व मानसी सुर्वे उपस्थित होत्या.

      फिनिक्स जिम्नॅस्टिक अ‍ॅकॅडमीच्या पूजा सुर्वे व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षाखालील गटात श्रेया भंगाळे हिने चॅम्पियनशीप पटकावित 3 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्यपदक पटकाविले. तर संयुक्ता काळे हिने 2 सुवर्ण, अस्मी बदादे हिने 2 सुवर्ण व किमया कार्ले हिने 2 सुवर्णपदके पटकाविली.

 17 वर्षाखालील गटात प्रियांका आचार्य हिने चॅम्पियनशीप पटकावित 4 सुवर्णपदके प्राप्त केली. 19 वर्षाखालील गटात किमया कदम हिने चॅम्पियनशीप पटकावित 6 सुवर्णपदके तर सिमरन फाटक हिने 1 सुवर्ण व 2 रौप्यपदके पटकाविली.

 फिनिक्स अ‍ॅकॅडमी या संस्थेला पाच वर्ष पूर्ण झाली असून पाच वर्षात संस्थेच्या जिम्नॅशियमपटूंनी केलेल्या या विशेष कामगिरीबद्दल त्यांचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे.

689 Views
Shares 0