रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग करणा-या सह-प्रवाशाला  अटक.

ठाणे :  ७  जून रोजी रिक्षात २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग आणि अपहरण करून तिला मारहाण केल्याची घटना ताजी असताना ठाण्यात पुन्हा एकदा सहा महिन्यानंतर माजीवडा येथून टर्न घेऊन वसंतविहारकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून  बँक कर्मचारी तरुणीचा  विनयभंग करणाऱ्या  विलास विशे याला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

     विलास विशे (२९), रा. शहापूर, जिल्हा ठाणे   हे दोघेजण बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक येथून शेअर रिक्षामध्ये बसले होते. रिक्षा माजीवडा येथून टर्न घेऊन वसंतविहारकडे जात असतांना आरोपीने  तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर वसंतविहार येथे आल्यावर काही नागरिकांनी पकडून त्याला चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले .

याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर  त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सदरचा प्रकार आपण जाणीवपूर्वक केला नसल्याचे विशे यांनी पोलिसांना सांगितले.

488 Views
Shares 0