बिल्डरचा प्रताप. फ्लॅट वर कर्ज घेऊन फ्लॅट दुसऱ्याला विकला.

ठाणे : प्रतिनिधी :- बॅंकेत फ्लॅटवर कर्ज घेऊन नंतर तो फ्लॅट दुसऱ्याला विकून बँकेचे हप्ते न भरल्याने बँकेच्या चौकशीत विकासकाने सादर केलेला फ्लॅट बनावट कागदपत्र बनवून विकून बँकेलाच गंडा घातल्याचे दोन प्रकार एकाच आठवड्यातच खोपट येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत उघडकीस आले आहेत.

या दोन्ही प्रकरणात आठ जणांवर गुन्हे नौपाडा पोलीस ठाण्यात बँक मॅनेजर रविराज लाडे यांनी दाखल केले आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

२ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खोपट शाखेत आनंद कवच असोसिएट चे रवींद्र पालेकर आणि किशोर गणपत सावंत यांच्याकडून आशिष पटेल यांनी स्टेटबँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेतले. बिल्डरने कर्जाचे दोन हप्तेही भरले. फ्लॅट धारक पटेल यांना फ्लॅटचा ताबा न देता दुसऱ्याला बनावट कागदपत्र बनवून विकला.

फ्लॅट न मिळाल्याने आशिष पटेल यांनी हप्ते भरलेच नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने बँक मॅनेजर लाडे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात बिल्डर, कर्जधारक आणि त्याचा जामीनदार अशोक कडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दुसरी घटनेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया खोपट शाखेचे मॅनेजर लाडे यांनी दुसरा गुन्हा ६ डिसेंबर रोजी दाखल केला. या गुन्ह्यात बिल्डर रवींद्र पालेकर,किशोर सावंत यांनी राजेंद्र पालेकर आणि यशस्वी पालेकर यांना आनंद कवच्छ प्रोजेक्ट मधील प्लॅट ४०४, ४ था माळ्यावरील फ्लॅट विकला.

 त्यासाठी राजेंद्र आणि यशस्वी यांनी खोपट येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतून ४ लाखाचे कर्ज घेतले. ४ लाखाचे कर्ज विकासकाच्या नावे  पालेकर दाम्पत्याला धनादेश दिला. त्यानंतर कर्जाचे हप्ते भरण्यात आले नाहीत. बँकेने वकिलामार्फत  नोटीसा  पाठवून सिविल न्यायालयात दावाही केला. त्याचा निकाल बँकेच्या बाजूने लागला. बँक व्यवस्थापन  फ्लॅट चा ताबा घेण्यासाठी गेले असता सदर फ्लॅटमध्ये नंदलाल खुशाल धरम आणि विजया धरम राहत असल्याचे आढळले. धरम कुटुंबांनी सदर फ्लॅट यासिन कुरेशी यांच्याकडून सब रजिस्टार कडे नोंद करून विकत घेतल्याचे सांगितले.

अखेर बँक मॅनेजर रविराज लाडे यांनी दुसरा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदविला. बिल्डरवर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतरही अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत
आहे.

629 Views
Shares 0