मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट अंपायर डॉ. प्रकाश वझे यांचे ट्रकच्या धडकेत अपघाती निधन.

मुंबई :- मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट अंपायर डॉ. प्रकाश वझे यांच्या स्कुटीला ट्रकने दिलेल्या धडकेने त्यांचे घटनास्थळावरच  निधन झाले.

ठाण्यातील आनंदनगर चेक नाका टोलनाक्याजवळ शुक्रवारी  दुपारी हा  अपघात घडला.  त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सहाय्यक नागप्पा हेडगे हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारी घडलेल्या अपघाताचा गुन्हा संध्याकाळपर्यंत नवघर पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

     सुवर्णपदक विजेते असलेल्या वझे यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अनेक प्रथम श्रेणी सामन्यामध्ये अंपायर म्हणून काम पहिले होते. अपायरिंग करत असतांना त्यांनी अनेक वर्षे नवोदितांसाठी मोफत क्रिकेट अंपायर प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली होती.  स्वताच्या नावाने स्थापन केलेल्या डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी  वैद्यकीय व्यावसायिकांसाठी टेनिस, डबल विकेट क्रिकेट, बॅडमिंटन च्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजित केल्या होत्या. याशिवाय स्थानिक पातळीपासून फिडे रेटिंग बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करून डॉक्टर वझे यांनी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील उदयोन्मुख बुध्दिबळपटूना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.

नवघर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

470 Views
Shares 0