एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे महापालिका करणार ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची निर्मिती.

ठाणे (प्रतिनिधी):- ठाणे पालिका आयुक्तांच्या संकल्पनेतील महापालिका अधिकारी परिषद प्रथमच ठाणे पालिकेत सुरु करण्यात आली. शुक्रवारी त्याचे उदघाटन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेच्या प्रथम बैठकीत ठाण्यात एनडीआरएफच्या धर्तीवर पालिकेचे ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स(टीडीआरएफ) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

एनडीआरएफच्या धर्तीवरील टीडीआरएफच्या नियोजनासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपत्कालीन व्यवस्थापन,अग्नीशमन दल  आणि माहिती जनसंपर्क अधिकारी यांची त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली  आहे. ही  समिती टीडीआरएफच्या स्वरूप कसे असेल, मनुष्यबळाची संख्या असा प्रारूप आराखडा एका आठवड्यात सादर करण्यात येणार आहे.

टीडीआरएफच्या कक्षासाठी निवृत्त लष्करी अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश समितीला आयुक्त जयस्वाल यांनी दिले आहेत.

577 Views
Shares 0