Fukray returns नाहीतर …फालतू Returns!!

आजकाल चित्रपटांमधून प्रतिमा विद्रुपीकरणाचे प्रकार जोरात चालू आहेत. मग ती व्यक्ती असो , संस्था वा राष्ट्राची प्रतिमा असो .

काल fukray रिटर्न्स चित्रपट कॉमेडी सिनेमा म्हणून बघायला गेलो होतो . सुरवातीचा भाग हसू येईल असा विनोदी होता पण मध्यंतरा च्या आसपास एक दोन असे संवाद कानावर पडले की हसणे थांबून चेहरा गंभीर झाला. पण बहुतेक प्रेषक त्याला सुद्धा हसत होते.

ते संवाद असे होते – Constitution का गुलाम हैं तू , जज खरीदले और मुझे जेल से बाहर निकालो ( आणि आरोपी बाहेर येतो ).
खरेच म्हणजे न्याय व्यवस्था विकत घेता येते का?? आणि विकत घेता येत असेल तर आम्ही या घटनेचे पालनकर्ते आहोत की गुलाम ! असा प्रश्न पडतो.

विनोदाच्या नावाखाली आजकाल काहीही खपवले जाते आणि प्रेक्षकांना सुद्धा ते पचते असेच वाटू लागले आहे. S दुर्गा आणि Nude अशा चित्रपटांच्या हात धुवून मागे लागलेला सेन्सर बोर्ड ह्या बाबतीत हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून बसला होता का ? ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

आम्ही ह्या घटनेचे कृतज्ञ आहोत आणि ह्या घटनेच्या मूल्यावरच असल्या थुकरट चित्रपटांचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहे.
आणि सरकार असो वा नेते सुद्धा स्वतःला जनतेचे सेवक बोलतात ….गुलाम नव्हे!

तलवारी पेक्षा शब्दांचा वार हा जास्त खोल आणि परिणामकारक असतो याचे चित्रपटांना भान राहावे आणि लोकांनी सुद्धा असे विनोदी संवाद डोक्यावर घेऊ नये की ज्याने घटनेची मूल्ये धोक्यात येईल . भविष्यात असे संवाद जर प्रचलित झाले तर देशाच्या एकतेला नख लागेल कारण गुलामी हा शब्द दुय्यम जीवनाचे प्रतीक आहे आणि दीडशे वर्ष गुलामी सहन केल्यानंतर या संविधानाने गुलामरहीत आयुष्यं जगण्याची जनतेला हमी दिली आहे आणि न्यायव्यवस्था त्याचे पालन होते आहे का नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम करत असते… त्यामुळे दोघांचा यथोचीत मान हा राखलाच गेला पाहिजे.

660 Views
Shares 35