Wed. Mar 29th, 2023

‘पद्मावती’ ला ग्रीन सिग्नल. ‘पद्मावत’ या नावानं 25 जानेवारीला होणार रिलीज.

८ जानेवारी : अनेक वादांनंतर ‘पद्मावती’ हा सिनेमा पद्मावत या नावाने २५ जानेवारीला प्रदर्शित होतोय. संजय लीला भंसाळी यांचा हा बहुचर्चित सिनेमा अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय.

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांच्या पद्मावत या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सॅनेटरी नॅपकिन्स हा विषय घेऊन अक्षय कुमारचा पॅडमन येतोय. त्याबद्दलही प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक पॅडमॅन ला अधिक पसंती देतात की पद्मावत ला हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

702 Views
Shares 8