
ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार.
ठाणे (8) :
स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे महापालिकेला होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 10 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 11 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत टप्प्या टप्प्याने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी परिसराचा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 10 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 9.00 ते रात्रौ 9.00 वाजे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर तलाव, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा -कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग बुधवार दिनांक 10 जानेवारी, 2018 रोजी रात्रौ 9.00 ते गुरुवार दिनांक 11 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.