Mon. Oct 3rd, 2022

नरेड्कोतर्फे पहिल्या रिएल्टी एक्स्पो 2018 चा ठाण्यात होणार शुभारंभ.

ठाणे :-
रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी नरेड्कोने सातत्याने प्रयत्न केले आहेत. आता, टाईम्स संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलसह नरेड्को पहिला प्रॉपर्टी एक्स्पो २०१८ अर्थात मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करत आहे. या एक्स्पोमध्ये रिअल इस्टेट, हाऊसिंग फायनान्स व घरसजावटीच्या वस्तूंचा समावेश असणार आहे.

हा फेस्टिव्हल 12 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत ठाण्यातील उपवन तलावाजवळील येऊर इथे होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही आहे. लक्झरी सेगमेंटमधील परवडणारी घरे तसेच पंतप्रधान मोदींच्या सर्वांना घरे या योजनेच्या अनुषंगाने हा एक्स्पो भरवण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात हिरानंदानी, रूनवाल, गोदरेज, रौनक व टाटा यांसारखे 90 विकासक तसेच एसबीआय कॅपिटल, टाटा कॅपिटल, एचडीएफसी या हाऊसिंग फायनान्स कंपन्यादेखील सहभागी होणार आहेत.
टाईम्स संस्कृती कला महोत्सव हे ठाण्यातील उपवन तलावाच्या नेत्रदिपक वातावरणात एक मेगा आर्ट इव्हेंट आहे. या महोत्सवामार्फत शास्त्रीय आणि समकालीन संगीत, शास्त्रीय नृत्य, व्हिज्युअल आर्ट, परफॉर्मिंग कला, पारंपारिक, पाककला व प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार तसेच प्रतिभावान स्थानिक आणि प्रादेशिक कलाकार यांच्याद्वारे आयोजित एक साहित्य उत्सव सादर केले जातात.

या महोत्सवास दरवर्षी लाखो लोक उपस्थित असतात. नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की,”मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रहिवाशांसाठी गृहनिर्माण नेहमी एक स्वप्न होतं. जागतिक उद्योग शहरातील एक अनुभव मुंबईतही आणण्याचा प्रयत्न करणारा एक कार्यक्रम म्हणजे मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल, एक योग्य पुढाकार आहे. टाईम्स संस्कृती आर्ट फेस्टिव्हल ठाणेकरांसाठी एक सांस्कृतिक गोष्टींसाठीची पर्वणी देणारा आहे. मुंबईकरांसह मुंबई उपनगरांमधील लोकांनाही सांस्कृतिक जीवनशैलीचा अनुभव या फेस्टिव्हलमार्फत घेता येणार आहे. आणि हेच नरेड्कोच्या रिएल्टी एक्स्पोचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा हा आमचा प्रयत्न यशस्वी व्हावा व ग्राहकांच्या स्वप्नातील घरांना एक वास्तव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आमचा आहे.”

या प्रसंगी बोलताना  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. आशुतोष राठोड म्हणाले, ” मुंबईत पहिल्यांदाच अश्या प्रकारचे शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन होत आहे. प्रथमच अशा प्रकारच्या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असताना सोबतच महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आम्ही करत आहे. अशा प्रकारच्या शॉपिंग फेस्टिवलच्या आयोजनामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविधतेचे सादरीकरण करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या प्रॉपर्टी फेस्टिवलद्वारे मुंबईकरांसाठी विविध आकर्षक ऑफर्सदेखील इथे उपलब्ध असणार आहेत.”

नरेड्कोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सांगितले की, “मुंबई शहरातील या पहिल्या शॉपिंग व प्रॉपर्टी एक्झिबिशन द्वारे आम्ही मुंबई शहरातील विकास दर्शवत आहोत. या प्रदर्शनांतर्गत प्रत्येक ग्राहकाला अथवा प्रदर्शन बघण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला घरासाठी लागणाऱ्या प्रत्येक आवश्यक गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

422 Views
Shares 0