नवीन छोटा Business सुरू करताय …मग बिनदास्त करा …

आपल्याकडे जर एखादा उद्योग सुरू करायचे म्हटलं तर पहिला प्रश्न येतो काय काय परवाने लागतीलआणि परवान्यांचे संख्या बघितली तर ते मिळवण्यासाठी अक्षरशः आपल्याला घाम फुटतो.

पण शासन आता ease of doing business कार्यक्रम अंतग्रत परवान्यांची संख्या कमी करत आहे. त्यातील आनंदाची गोष्ट म्हणजे आता पासून नगरपालिका /महानगरपालिका क्षेत्रात 10 पेक्षा कमी कामगार काम करत असलेल्या छोट्या अस्थापणाना गोमस्ता परवान्याची गरज लागणार नाही .
तरुण उद्योजकांना यातून फायदा होणार आहे.स्टार्ट up उद्योजकांना पण यातून बळ मिळेल. उद्योगाच्या सुरवातीचा वेळ सरकार दरबारी हेलपाट्या मध्ये न घालवता पायाभरणी करण्यासाठी वापरण्यात येईल.

या नवीन निर्णयबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन!!
नवीन उद्योग सुरवात करताना लागणाऱ्या काही इतर परवान्याची नावे खाली दिली आहेत.

1.पॅन no.
2. टॅन no.
3.कंपनी/llp/पार्टनर शीप चे प्रमाणपत्र
4. कंपनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता करावी लागेल.
A) डिजिटल प्रमाणपत्र
B)डायरेक्टर इडेंटिफिकेशन
नंबर
C) कंपनीच्या नावाला संमती (ROC) कडून मिळेल
D) कंपनी निवेदन मसुदा आणि सहयोगी कलम पत्रिका
E) चालू बँक खाते
5 .GST नोंदणी
6. भविष्य निर्वाह नोंदणी
7. राज्य विमा प्राधिकरण नोंदणी
8 .व्यावसायिक कर नोंदणी
9 .RBI ची संमती ( जर व्यवसायमध्ये ऑनलाईन पेमेंट गेटवे वापरणार असाल तर)

टीप – जर व्यवसायासाठी पैशाच्या व्यवहारासाठी ऑनलाईन पेमेंट गेटवे वापरणार असाल तर कंपनी प्रकारामध्येच व्यवसायाची नोंदणी करावी.

646 Views
Shares 2