ठाणे शहरातील रेतीबंदर गणपती विसर्जन घाट परिसरात सिलेंडरच्या स्फोटात, निष्पाप प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. सिलेंडरच्या या स्फोटात सहा बकऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
रेतीबंदर गणपती विसर्जन घाट या ठिकाणी केबिन कंटेनरमध्ये निर्मल महातो या व्यक्तीने सहा बकऱ्या पाळल्या होत्या. सोबतच येथील केबिन कंटेनरमध्ये चार व्यावसायिक सिलिंडर होते. या सिलेंडरच्या स्फोटामुळे निष्पाप सहा बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.
या स्फोटामध्ये बकऱ्यांसह एक दुचाकी जळून खाक झाली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या स्फोटाचे नेमकं कारण काय याबद्दल अधिक तपास सुरू आहे.