ठाणे शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली एक धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आल आहे. ‘वेलनेस थाय स्पा’ या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पा सेंटरच्या मालकीणीसह दोघांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. या स्पा सेंटरमधून पोलिसांच्या मदतीने सात पीडित तरुणींची सुटका केली आहे.
पैशाच्या आमिषाने काही मुलींकडून मसाज आणि देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार पोलिसांच्या सतर्कतेने बनावट गिऱ्हाईकांच्या मदतीने यातील दलाल महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेलनेस थाय स्पा, या मसाज सेंटरमधून मोबाईलसह गर्भनिरोधक सामग्री ही पोलिसांनी जप्त केली आहे. या मसाज सेंटरमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांना मिळाली, पोलिसांच्या सतर्कतेने अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील व उपायुक्त जाधव यांच्या योग्य नियोजनामार्फत, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या टीमने ठाण्यातील या वेलनेस थाय स्पा या मसाज सेंटरमध्ये छापा टाकून तरुणींची सुटका करून, तेथील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.