माघी गणेशोत्सव निमित्त सार्वजनिक मंडळामध्ये आपल्याला विविध देखावे आणि कलाकृती पाहायला मिळते. यंदाच्या वर्षी कल्याणच्या गणेशोत्सव मंडळाने माघी गणेशोत्सवनिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा या मंडळाचे माघी गणेशोत्सवाचे 30 वे वर्ष असून, यंदाच्या वर्षी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली होती.
कल्याण पश्चिमेच्या, श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून या भव्य प्रतिकृतीचे काम सुरू होते. ही कलाकृती 40 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 70 फूट उंच इतकी भव्य आहे. कल्याणमधील ही कलाकृती पाहण्यासाठी व बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते.